About Us

डॉ. शेख अफसर – आरोग्य जनजागृतीचे प्रेरणास्थान

डॉ. शेख अफसर हे नाव आज पत्रकारिता, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक चळवळींमध्ये एक प्रखर व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहे. त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून समाजात आरोग्य जागृतीची बीजे रोवली आहेत.

मुख्य संपादक – दैनिक आरोग्य जागृती
“दैनिक आरोग्य जागृती” या अग्रगण्य मराठी वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून डॉ. अफसर यांनी आरोग्य विषयक बातम्या, संपादकीय लेख व माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

आरोग्य जागृती युट्यूब चॅनेल
डिजिटल माध्यमातील महत्त्व ओळखून त्यांनी आरोग्य जागृती युट्यूब चॅनेल सुरू केले. या माध्यमातून विविध तज्ज्ञांची मुलाखत, आरोग्य विषयक माहिती, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रम ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत.

मुख्य संपादक – खडक़ी समाचार
स्थानिक पातळीवरही जनतेच्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी खडक़ी समाचार या वृत्तपत्राचे संपादन करून त्यांनी पत्रकारितेला दिशा दिली आहे.

अध्यक्ष – आरोग्य जागृती असोसिएट
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आरोग्य जागृती असोसिएट ची स्थापना केली. या संस्थेमार्फत विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत तपासणी मोहीमा आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात.

व्यवस्थापकीय संचालक – जागृती पब्लिकेशन
ज्ञान प्रसाराचे माध्यम म्हणून त्यांनी जागृती पब्लिकेशन स्थापन केले. या प्रकाशनातून आरोग्य, समाजकारण आणि जनजागृतीविषयक साहित्य प्रसिद्ध केले जाते.

सचिव – वैद्यकीय कक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)
समाजकारण व राजकारणात सक्रिय सहभाग घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैद्यकीय कक्षाचे सचिवपद भूषविले आहे. पक्षाच्या माध्यमातून आरोग्यसेवा व समाजसेवा कार्य ते सातत्याने करीत आहेत.

कार्याचा ठसा

डॉ. शेख अफसर यांचे कार्यक्षेत्र हे फक्त पत्रकारितेपुरते मर्यादित नाही, तर ते आरोग्य, समाजकारण आणि शिक्षण या सर्वच अंगांनी समाजावर सकारात्मक प्रभाव पाडत आहे. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना सुचवणे, जनजागृतीसाठी नवे नवे उपक्रम हाती घेणे आणि समाजहितासाठी अविरत कार्य करणे हे त्यांचे ध्येय आहे.