एम. जी. एम. संस्थेचे मा. अंकुशराव कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कार्य करत असून, त्यांनी राबविलेल्या “आरोग्य जागृती” उपक्रमामुळे हजारो गरजू रुग्णांना मोफत व सुलभ उपचारांचा लाभ मिळत आहे.
या उपक्रमामार्फत ग्रामीण व शहरी भागांतील आरोग्य विषयक अज्ञान दूर करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली जात आहे. विविध आरोग्य शिबिरे, तपासणी मोहीम, मोफत औषधे व उपचार सेवा, तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची सुविधा यामुळे अनेक रुग्णांचे जीवन वाचले आहे. या कार्याबद्दल बोलताना स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “मा. अंकुशराव कदम यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एम. जी. एम. आरोग्य जागृती उपक्रम गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरत आहे. समाजाच्या आरोग्यविषयक गरजांची जाण ठेवून ते सातत्याने कार्यरत आहेत, हे कौतुकास्पद आहे.”
याप्रसंगी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील उपक्रमांना यश लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.