डॉ. प्रकाश कांकरिया यांचे समाधानशहरी असो की ग्रामीण, गरीब व गरजू रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, त्यांना स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांची आणि डॉक्टरांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य जागृती अभियानातून खरी जनजागृती घडते आहे, असे समाधान डॉ. प्रकाश कांकरिया यांनी व्यक्त केले.डॉ. कांकरिया म्हणाले, “सामान्य नागरिक, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्ण, अनेकदा आधुनिक वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहतात. त्यांना कोणत्या आजारासाठी कुठे जायचे, कोणते तज्ज्ञ डॉक्टर आहेत, कोणती रुग्णालये विशिष्ट उपचारासाठी उपलब्ध आहेत याची माहितीच नसते. आरोग्य जागृती हे वृतपत्र हे अंतर भरून काढण्याचे अत्यंत मोलाचे कार्य करत आहे.”ते पुढे म्हणाले, “या अभियानाच्या माध्यमातून केवळ वैद्यकीय माहितीच नव्हे, तर शासकीय योजनांची माहिती, मोफत उपचाराची केंद्रे, व विविध तपासणी शिबिरांचे वेळापत्रक देखील नागरिकांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे गरजू रुग्ण योग्य वेळी उपचार घेऊ शकतात आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचे गांभीर्य कमी होते.”डॉ. कांकरिया यांनी आरोग्य जागृतीच्या उपक्रमाचे कौतुक करत असे सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे अभियान सातत्याने राबवावे आणि त्यामध्ये अधिक डॉक्टर्स व रुग्णालयांनी सहभागी व्हावे असे आवाहनही केले. “ही खरी जनजागृती आहे – उपचाराच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल,” असे नमूद करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
