“आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या कार्याची दखल घेत प्रसिद्धी देणे, हा एक अत्यंत स्वागतार्ह उपक्रम आहे,” असे मत सुप्रसिद्ध आरोग्य तज्ञ डॉ. ए. ए. कादरी यांनी व्यक्त केले. वाढदिवस, रुग्णालयांचे वर्धापनदिन तसेच विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करून डॉक्टरांचे कार्य समाजापर्यंत पोहचवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, त्याबद्दल डॉ. कादरी यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “या माध्यमातून केवळ डॉक्टरांचेच नव्हे, तर आरोग्य जागृतीचेही मोठे काम होते. जनसामान्यांमध्ये आरोग्यविषयक माहिती पोहोचवण्याचे हे एक प्रभावी साधन आहे.’
आरोग्य सेवा ही केवळ एक नोकरी नसून ती एक समाजसेवा आहे, हे ध्यानात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले. यामुळे नवोदित डॉक्टरांमध्ये प्रेरणा निर्माण होते आणि जनतेचा आरोग्यावर विश्वास अधिक दृढ होतो, असे त्यांनी सांगितले. आरोग्य जागृती डॉक्टर करता प्रसिद्धीस व एक हक्काचे व्यासपीठ सर्व सामान्य रुग्णांना याचा फायदा होईल
